रहस्यमय स्त्री - भाग १

(33)
  • 36.9k
  • 29.6k

रेशमा आणि अमरच्या ७ वर्षाच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव मिळालं होत . रेशमाच्या आई वडिलांना खूप समजवल्या नंतर हा सोन्याचा दिवस त्याच्या आयुष्यात आला होता . अमर अनाथ असल्याने रेशमाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीशी अमरच लग्न लावून देणं अयोग्य वाटत होत , मात्र मुलीच्या हट्टा पुढे व सुखापुढे ते तयार झाले , तसेच अमरच स्वतःच घर होत , त्याचे घर त्यांच्या घरापासून तास - भर अंतरावर होते . अमर सोबत रेशमा सुखी असेल तसेच मुलगी नजरें समोर असेल या विचारांनी त्यांनी दोघांचं लग्नं लावून दिलं .... दोघंही खूपच खुश होते , २ महिने कशे गेले कळलेच नाही . नेहमी प्रमाणे