आघात्त प्राची घरी आली तेव्हा आठ वाजून गेले होते निमिष नुकताच ऑफिस मधुन आला होता आणि कपडे बदलत होता .आज त्यालाही नेहेमीपेक्षा उशीरच झाला होता .आल्या आल्याच तो प्राचीची चौकशी करणार हे नीलिमाला माहित होते त्याला काय उत्तर द्यायचे असा विचार करणाऱ्या नीलिमाला प्राचीला पहाताच अगदी “हायसे” झाले .काय हा उशीर प्राची ,जा चटकन हात पाय धुवून घे ,कधीपासून वाट पाहतेय मी .सहाला येणारी तु किती हा उशीर आज ?नशीब माझ तुझ्या पप्पाला पण यायला आज उशीर झालाय जा आता तुच सांग तुझी कारणे त्याला .” नीलिमा आत जाऊन टेबल वर जेवणाची तयारी करू लागली .थोड्याच वेळात बाप आणि लेक