कवर फाटलेलं पुस्तक - भाग - II

  • 4.6k
  • 2.2k

कवर फाटलेलं पुस्तक भाग-II  रात्रीचे दोन वाजले असतील, दरवाजावर दोन चार वेळा थपथपाटलेला आवाज ऐकू आला. मी-"कोण आहे, काय झालं इतक्या रात्री दरवाजा वाजवायला?" बाहेरून कुणीतरी बोललं,"कोण जागं आहे?" मी-"हा, बोलतोय, काय पाहिजे?" बाहेरून परत आवाज आला,"ती तुमची मेसवाली, जास्तच कणत,विवळत आहे, तिच्याजवळ कुणीच नाही म्हणून सांगायला आलो,बघा तेवढं काय झालंय तिला." मी झोपेतून पटकन उठलो,मित्र 'दिपकला' उठवले आणि त्याच्यासोबत मेसवालीच्या रूमवर गेलो. ती चटईवर लोळण घालत विवळत होती.ही तिची अवस्था पाहून तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक होते.मला काय करावं सुचत नव्हतं.तोपर्यंत दिपक भाड्याची ओमीनी कार घेऊन आला.येवढ्या रात्री याला कशी काय कार सापडली समजले नाही.तिला ताबडतोब