३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७

  • 8.8k
  • 2.2k

३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७ ७. पुरंदर किल्ला- पुरंदर किल्याला ऐतिहासिक महत्व आहे ते संभाजी महाराजांमुळे. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्यामुळेच पुरंदर किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. पुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच आहे आणि हा पुरंदर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. इथे ट्रेकिंग ला जाणाऱ्या ट्रेकरसची संख्या बरीच असते. त्याचे कारण म्हणजे पुरंदर किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा आहे. इतिहासाच्या खुणा जपलेल्या पुरंदर किल्ल्याचा विस्तार मोठा आहे. इतिहासात 'अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला आहे. या किल्ल्यावर काही दिवस