प्रलय -०३ जलधि राज्याचे अधिपती राज्यांची निर्मिती झाल्यापासून कैरव राजे होते . सध्या अकरावे कैरव महाराज राज्य करत होते. महाराज वृद्ध होते . शुभ्र पांढऱ्या केसांवरती सोनेरी मुकुट होता. वृद्धत्व आलेलं असूनही चेहऱ्यावरती एकही सुरकुती नव्हती . राज्याला दोन बाजूंनी समुद्राच्या सीमा असल्यामुळे त्याचं नाव जलधि पडलं होतं. जलधि हे राज्य इतर सर्व राज्यांपेक्षा भरभराटीचे राज्य होतं . असं म्हणतात जलधि मधील भिकारी हे बाकीच्या जगातील श्रीमंतपेक्षा श्रीमंत असतात. त्याच जलधि राज्याच्या राजमहालात आज ही राज्य सभा भरली होती . राजमहाल किती आलिशान होता . त्या ठिकाणी सिंहासने नव्हती तर कमलासने होते . शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेल्या कमळाच्या