पु.ल.देशपांडे! कोण होते?असे विचारण्या पेक्षा, काय काय होते हे विचारणे सयुक्तिक होईल. लेखक,-नाट्य, ललित, प्रवास वर्णन, भाषणे, -पटकथा लेखक, दिग्दर्शक, कवी, संगीत दिग्दर्शक, उत्तम रसनेचे खवय्ये, जाणकार श्रोते, शिक्षक, आणि एक विद्यार्थी सुद्धा! पंडित नेहरूंची दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या प्रसारणासाठी, मुलाखत घेणारे पहिले मुलाखतकार पु.ल.च होते. रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका पण, त्यांच्या हातातून सुटल्या नाहीत! आणि एक छान ,उमदा माणूस! असे all -in -one व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात तरी नाहि. मी पु.ल.देशपांडे यांचा मोठा चाहता आणि छोटासा वाचक आहे. जितके वाचलय त्यानेच मला त्यांनी आपलस केलंय आणि आपण पु.ल.ना अनेक जन्मान पासून ओळखतो, हि भावना पण मनात रुजून गेलीयय. ते कधी परके वाटलेच