प्रलय - ७

  • 8.3k
  • 1
  • 4.2k

प्रलय-०७      त्या गोल वर्तुळाकार नकाशा भोवती सर्व जण जमले होते . जलधि राज्यात आज कितीतरी वर्षांनी त्या युद्ध कक्षात ही तात्काळ  बैठक बोलावली  होती .  काही विशेष मंत्रीगण , हेर पथकाचे प्रमुख ,  सेनाप्रमुख प्रमुख सल्लागार आणि स्वतः महाराज कैरव त्या ठिकाणी उपस्थित होते . महाराज कैरव बोलत होते , " आपल्या राज्यसभेत आणि संशोधन शाळेत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही पाहिल्या . तो माणूस आणि त्याचे ते विचित्र शब्द , हे आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे . तो काय करू शकतो हे ही आपल्याला ज्ञात आहे  .  आपला शत्रू त्या काळ्याभिंतीपलीकडे आहे आणि त्यांची संख्या जरी