३४. महाराष्ट्रातील किल्ले- ९

  • 10.1k
  • 3.5k

३४. महाराष्ट्रातील किल्ले- ९ ९. पन्हाळा- पन्हाळा महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध किल्ला आहे. हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान आहे. कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी च्या रस्त्याच्या दक्षिण दिसेह्ला सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. त्यामुळे इथे ट्रेकर्स ची गर्दी असते. महाराष्ट्राच्या इतिहासात ह्या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व आहे. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही मानाने नांदता आहे. कोकण आणि घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या किल्ल्यावर