रोगा-यण !

  • 2k
  • 750

खूप दिवसा पासून, म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून, या क्षणाची मी वाट पहात होतो. तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच! तसा तो बरेचदा आला आहे.पण आता मला 'त्या 'पोस्ट' मुळे, नेमकं काय करायचं ते कळलंय, आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे! रात्री पासूनच माझ्या अंगात कणकण वाटत होती. अधन मधनं थंडीचा काटा फुलत होता. झकास! आता ताप येणार, मग डॉक्टर, मग औषधाचं गाठोडं ...... . हे असच मला पाहिजे.! झालं पण तसाच. किंचित अंग तापलं. श्वास उष्ण वाटू लागला. मला धीर निघेना. तडक डॉक्टर गाठला. मग नेहमी प्रमाणे, निदान न होणाऱ्या तापला डॉक्टरानी 'व्हायरल' करून टाकल. " व्हायरल