प्रलय-१३ मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती . वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते . ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं . तिची संवेदना जणू नष्ट झाली होती . पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती . जणू तिचा नुकताच जन्म झाला होता . बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या , त्या गोष्टी तिला आठवत होत्या. आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या . कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते , पण