बनूच्या वेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म झाली, तेव्हाच तो 'बनूचा बाबा 'झाला होता. बनूच्या बारशाला फक्त त्याचे ' बनुचे बाबा' म्हणून बारसे झाले इतकेच! बनूच्या जन्माच्या वेळेस, त्याने बनूच्या शिक्षणा साठी पॉलिसी घेतली होती. त्याच्या प्रीमियमने पगाराचा एक लचका तोडला होता. पण बनू साठी चालतंय. थोडी ओढ बसेल, पण बनुचे भविष्य महत्वाचे, नाही का? खरे तर पॉलिसी मॅच्युअर झाली, तेव्हा ते पैसे तोकडेच पडले हि गोष्ट निराळी! बनू लहान असताना बनूची आई लग्ना -कार्यात, सिनेमा नाटक पहाताना, बनुचे बाबा बनूला वाजंत्रीवाले, वरातीचा घोडा, सिनेमाची पोस्टर दाखून त्याला खेळवत असत. बाजारात खरेदीच्या वेळी, बनू बाबाच्या कडेवर असायचा. कधी चालताना झोप आली की,