सेकंड इनिंग!

  • 3.3k
  • 1.1k

आपण जसे आपल्या पहिल्या ' इनिंग ' कडे,- म्हणजे शिक्षण, नौकरी -व्यवसाय, लग्न - या कडे जसे लक्ष देतो, तसे आपल्या ' सेकंड इनिंग ' कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य. या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते. 'वेळ आल्यावर पाहू ' ' आत्ताच काय घाई आहे ?' म्हणून टाळून देतो. मीही तेच केले. अचानक दोन वर्ष मुदत -पूर्व निवृत्ती घेणे भाग पडले, अन माझे काय चुकले हे लक्षात आले. पण तोवर वेळ पुढे सरकली होती! मला ज्या अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातील बऱ्याचश्या, पूर्व नियोजन केले असतेतर, कमी किंवा सौम्य झाल्या असत्या, असे आता