प्रलय - १७

  • 6.9k
  • 3.2k

प्रलय-१७ ज्यावेळी आयुष्यमान हवेत उलटा लटकला . त्याच्या मानेवरती काहीतरी टोचल्या सारखे वाटले . हळूहळू त्याच्या सर्व जाणीवा व संवेदना बधीर होत गेल्या . शेवटी डोळ्यापुढे संपूर्ण अंधार पसरला . तो बेशुद्ध झाला . ज्या वेळी त्याला जाग आली तो जमिनीवरती पालथा झोपला होता . हात वरच्या बाजूला केले होते व लोखंडी हात बेड्या ज्या जमिनीत रुतलेल्या होत्या त्याच्यात अडकवले होते . पायांच्या बाबतीतही तसंच होतं . त्याचे हात व पाय दोन्ही गुंतवले होते . जमिनीला असलेल्या त्या बेड्या मध्ये त्याचा हात व पाय गुंतवले होते . त्याच्यातून निसटणे अशक्य होते . त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल