आडगाव ची स्मशानभूमी

  • 8.3k
  • 3
  • 2.1k

 आडगावची स्मशानभूमीआडगाव पाचशेहून अधिक उंबऱ्याच गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. गाव तस चांगलं.  अन्य गावांनी आदर्श घ्यावा अस. शासनाच्या सगळ्या योजना राबवण्यात गाव सतत पुढे . गावाला शहरीकरणाचे वार लागलेलं.  गावात सिमेंट काँक्रीटच्या अनेक मजली इमारती. गावचा कारभार पाहण्यासाठी एक छोटीशी  ग्रामपंचायत. गाव छोटं असल्यानं मोजून सहा सदस्य. त्यातबी तीन महिला अन तीन गडी माणस. कैक वर्षांपासून महिपती पाटील सरपंच पदाची खुर्ची अडवून बसलेलं. त्यांना इरोध करायची कुणाची हिम्मत नव्हती.  दर पाच वर्षांनी इलेक्शन व्हायचं. मात्र सरपंच महिपती पाटीलच.औन्दा मात्र इपरितच घडलं. आरक्षण पडलं अन सरपंचपद महिला राखीव झालं. बाया बापड्यांना बदल पाहिजे हुता. महिपती पाटील दूर होणार म्हंटल्यावर गावात दबक्या