ऊंबरखिंड लोहगड आणि विसापूर दोन्ही किल्ल्यांवर १००० ते १५०० ची शिबंदी होती...पण मराठयांनाकडून काडीचाही प्रतिकार होत नव्हता... कारतलबखान स्वतःच्या अक्कल हुशारीवर खूष होत होता... शाहीस्तेखानाने अगदी विश्वासाने शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले...कारतलबखानाने आपल्या स्वारीचा मार्ग एकदम गुप्त ठेवला होता..आपल्या बरोबर असलेल्या कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार (सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन) यांनाही खबर लागू दिली नव्हती...रायबाघने दोनतीन वेळा समजावयाचा प्रयत्न केला...आपण आता मराठयांच्या सह्याद्रीत आहोत..आणि ह्या सह्याद्रीने आतपर्यंत मराठयांशिवाय कोणालाही आपल्या अंगा-खांदयावर खेळायला दिले नाही.. आणि हे मावळे म्हणजे शिवाची भुते आहेत कसे कुठून येतील आणि मारून जातील पत्ता