अनाहूत - १

  • 7.7k
  • 1
  • 3.1k

रोहन तुझी बॅग आवरलीस का? ,रोहनची आई त्याला ओरडून विचारात होती.रोहन हा बारा तेरा वर्षांचा हुशार चुणचुणीत मुलगा,तसे तर त्याला त्याच्या मामाच्या गावाला जायला खुप आवडायचे.पण यावेळी त्याचे सर्व मित्र अलिबागला फिरायला जाणार असल्यामुळे तो बळेबळेच कदाचित नाईलाजाने आईसोबत मामाकडे निघाला.सकाळी बरोबर सहा वाजता रेल्वेने रोहन आणि त्याची आई कोकणाकडे निघाली. मस्त निळाशार समुद्र हेलकावणारा वारा झेलत तो खिडकी कडे तोंड करून बाहेरील निसर्गाचा आनंद घेत निघाला.वाटेत त्याला हिरवीगार आमराई दिसताच कोकन आल्याची चाहूल त्याला लागलीच होती.रोहनचा मामा त्याला घ्यायला आलेलाच होता.मस्त पैकी बैलगाडी मध्ये बसून तो आपल्या आजोबाच्या जुन्या प्रशस्त वाड्याकडे पोहचला.वाड्यावर पोहचताच विवेक ला पाहून त्याला खूप आनंद