प्रलय-२० महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी राजकुमारास घेतले . तो राजकुमार त्यांनी ' त्याच्या ' ताब्यात दिला . तो तोच होता . संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला , विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला . त्याच्याभोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे . बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत होता . त्यामध्ये महाराणी शंकूतलेचाही समावेश होता . ज्यावेळी राजकुमार त्याच्या ताब्यात दिला . त्यावेळी भक्त त्याच्या मागोमाग निघाले . मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेला अभिजीत अद्वैतही निघाला . हा तोच अद्वैत होता , जो तीनशेजनांच्या तुकडीचा प्रमुख होता . ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसांपूर्वी नष्ट केले होते