माझा सिनेमा!

  • 4.3k
  • 1.3k

भारतातले 'सिनेमावेडे' लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडकाआणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल 'एक छछोर नाद!' असे मत होते. असो.(मी महाराष्ट्रातला तेव्हा 'सिनेमा ' म्हणजे 'हिंदी सिनेमा' असाच घ्यावा.) आमचं ' शिंग ' फुटण्याचा आणि त्या 'छछोर ' सिनेमाचा डेरेदार वृक्ष होण्याचा एकच समय आला. मग काय? कसलाही विचार न करता,पाणी पुरी सारखे, मिळतील तितके सिनिमे पाहून घेतले! त्याचे तेव्हाही वाईट वाटले नाही, आणि आजही वाटत नाही! उलट आज तर मी जुन्या सिनेमाच्या ऋणात असल्याचे अभिमानाने सांगतो! घरच्या वडीलधाऱ्यांन आणि शाळेतल्या शिक्षकानं पेक्षा, काकणभर ज्यास्तच संस्कार या सिनेमाने केले