परमेश्वराचे अस्तित्व - २

  • 8.5k
  • 3.7k

"व्यक्त मन व अव्यक्त मन" व्यक्त मन म्हणजे स्वतः विषयीचे विचार,व अव्यक्त मना मध्ये अनेक स्मृती,संस्कार,भावना,किंवा अतृप्त इच्छा साठविलेल्याअसतात.मन सर्व व्यापी तसेच सर्व शक्ती मान आहे.मानवी शरीरावर मनाचा प्रभावपडत असतो.तसेच मन चंचल आहे."चंचल हि मन:कृष्ण प्रमाथि बलवत दृढमयस्याह निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम" अर्थ:-मन चंचल असून कोणताही निग्रहतडीस जाऊ देत नाही.बलवान व अभेद्य आहे.वायू प्रमाणे दुसाह्य आहे.मन विचारालाचकविते,एक ठिकाणी बसले तर दाही दिशाहिंडविते,मनाची वृत्ती बेहमी चंचल असते.कोणी म्हणतात विचारांचा प्रवाह म्हणजे मन. पण मन आणि विचार भिन्न असतात,आपणम्हणतो माझ्या मनात विचार आला याचाअर्थ मन आणि विचार भिन्न आहेत.मन हेएकाच वेळी अनेक ठिकाणी कार्यरत असत.