पॅरिस – २

  • 8k
  • 1
  • 4.1k

टिक-टॉक .. टिक-टॉक .. टिक-टॉक … घड्याळाचा काटा अती संथ गतीने पुढे सरकत होता. एअरपोर्ट वरच महागडं आणि बेचव खाण्यापेक्षा घरुनच मस्त पुरी-भाजी करुन न्हेली होती. ती खाल्ली, थोडं झोपायचा हि प्रयत्न केला, पण त्या खुर्चीत असं अवघडून बसून कितीशी झोप लागणार.? उगाच इकडे तिकडे टाईमपास फोटोही काढून झाले. मला असं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं असं निरीक्षण करायला वगैरे नै आवडत. लोकांना भारी आवडतं ब्वा हे व्यक्तीनिरीक्षण. नेट वापरुन वापरुन फोनच्या बॅटरीने मान टाकली मग चार्जर घेऊन चार्जिंग पॉईंटपाशी जाऊन उभा राहीलो. तेथे जमलेल्या काही लोकांनी भारी शक्कल लढवली होती. स्मार्ट-फोन बरोबरच एक साधा कि-पॅड वाला फोन पण बरोबर ठेवला होता.