किल्ले रायगड - एक प्रवास

  • 12.2k
  • 2.8k

किल्ले रायगड खूप वेळा हा किल्ला मी वाचला आहे...शरीराने फक्त ३ ते ४ वेळाच गेलो आहे..पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मनाने मी तिथेच मुक्कामी असतो...हाच किल्ला आम्ही का निवडला ?? कसे गेलो ?? ते आता मी सांगणार आहे... मी,प्रसाद कदम, भिवाजी कदम आणि किरण काडगे एप्रिल २००८ ला एकाच कंपनीत १५ ते २० दिवसाच्या अंतराने कामाला लागलो...नवीनच असल्यामुळे...चौघेही जरा उशिराच जेवायला जायचो...हळू हळू मैत्री वाढत होती..एकमेकांचा अंदाज घेणे चालू होते...सर्वांत कॉमन गोष्ट एकच निघाली... राजे आणि आम्ही वाचलेले बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती ची केलेली पारायणे... मग त्यात उल्लेख असलेले किल्ले...मग त्यात एकदा प्रसाद बोलून