पाऊस 

  • 4.7k
  • 1
  • 894

पाऊस त्या राञी तो धो-धो कोसळत होता. त्याच्या येण्याने सर्वजण खुप आनंदी झाले होते. तो येताना ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मोरांचा नाच , बेडकांचे डराँव डराँव , झाडांचा कुजबुजाट चालू होता. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. सर्व वातावरण आनंदमय झाले होते. आपली माय धरती मातेला कधी त्याला आपल्या कुशीत घेऊ असे तिला झाले होते.पण ती माञ या आनंदमय वातावरणातही आनंदी दिसत नव्हती , तिचे डोळे आशेने खिडकीतुन सतत रस्तावर कोणाला तरी शोधत होते. ती अस्वस्थ होती, बिथरलेली होती किंबहुना घाबरलेली होती. तिच्या हरिणासारख्या टपोरी डोळ्यातून सतत अश्रुंचे ओघळ वाहत होते. सर्व वातावरण आनंदी असताना ती एकटीच दुःखी का होती ?