ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 6

  • 22.9k
  • 13.1k

क्रमशः त्या सर्वांचे मिळून मग महाबळेश्वरला जायचं ठरते पण नेमके त्याच दिवसात प्रीतीच्या कॉलेज परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख येते आणि त्यामुळे त्यांचे महाबळेश्वरला जाणे थोडे लांबणीवर पडते. प्रीती पुण्याला जाऊन तिचे परीक्षेचा फॉर्म भरून आलेवर त्यांची फॅमिली पिकनिकची महाबळेश्वरला जाण्याची तारीख अखेर निश्चीत होते ती म्हणजे २६ डिसेंबर. कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा फॉर्म भरलेनंतर प्रीतीची अक्षरशः कसरतच चालू होते. लहान मुलीला प्रतीक्षाला सांभाळून तिला तिचे कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा अभ्यास पूर्ण करायचा असतो. पण आशा परिस्थितीतही ती न खचता, न डगमगता, स्वतःचे मनाशी खंबीर राहून जोमाने तिचे परीक्षेची तयारी चालूच ठेवते. कॉलेजचे परीक्षेच्या अभ्यासासाठी तिच्याकडे आता फक्त तीनच महिने