पॅरिस – ५

  • 6.4k
  • 2.9k

बेल्जीयम वरून पॅरिसला परत येताना, सकाळपेक्षा हायवे-वर वाहतूक अंमळ जास्त होती, पण अर्थातच कुठेही घाईगडबड नाहीच. ओव्हरटेकिंग नाही की होंकिंग नाही. शेजारी पसरलेल्या विस्तीर्ण शेतांमध्ये सधन शेतकरी आपली अवजड वाहन चालवत शेतातली कामं करत होती. सूर्याची तिरपी, कोमल किरणं मस्त गोल्डन लाईट पसरवत होती. बसमध्ये खायला परवानगी नव्हती, पण ऐकू तर आपण भारतीय कुठले. एकेठिकाणी थांबलेल्या मॉल वर काही वेगळ्याच चवीचे चिप्स आणि कुकीज घारेदी केल्या होत्या त्या खुणावत होत्या. आजूबाजूची जनता घोर झोपेत मग्न होती. मग हळूच पिशवीत हात घालून एक एक गोष्टी काढून, आवाज न होऊ देता चर्वण चालू केले. पॅरिसमध्ये शिरुन अर्धा-पाऊण तास होऊन गेला