१० मे, २०१८ कालचा एकूण गोंधळ निस्तरून झोपेस्तोवर दीड वाजून गेला होता. त्यामुळे अर्थातच सकाळी उठायला जाम जिवावर आले होते. वातावरण आज चांगलेच गार होते, साधारण ४ डिग्री तरी असावे आणि त्यात इथे वाहणारे गार वारे अजूनच झोंबत होते. वाटत होतं, सगळे प्लॅन्स रद्द करुन परत झोपून जावं. स्वातीताईंच्या प्लॅन नुसार आजची सकाळ आम्ही पॅरिसमधल्या कॅनल्स वरील एका क्रूज राईडला जाणार होतो, अर्थात हि राईड नेहमीसारखी नसून वेगळीच आहे, काय ते तेथे गेल्यावरच तुम्हाला कळेल असं सांगून तिने आमची आमचा उत्सुकता आधीच वाढवलेली होती, शिवाय तिकिटं हि काढलेली असल्याने उठून पटापट आवरले, ब्रेकफास्ट उरकला आणि बाहेर पडलो. सेंट मार्टिन