पॅरिस - ९

  • 7.2k
  • 2.8k

बीच-बेबी-बीच- एट्रीटात- ११ मे, २०१८ पॅरिसला निसर्गाची, सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण आहे, .. पण समुद्र किनारा नाही. फ्रेंच रिव्हिएरा .. जेथे जगप्रसिद्ध फॉर्मूला-वन कार रेसेसचा मोनॅको ट्रॅक आहे तेथील बीचेस खूपच प्रसिद्ध आहेत पण एक तर तिथे जाणे आणि रहाणे अती महागडे आहे आणि तेव्हढा वेळही हातात नव्हता. पण दुसरा पर्याय होता तो म्हणजे एट्रीटातचा. परिसपासून साधारणपणे २५० कि.मी. वर वसलेले हे छोटेसे पण सुंदर हार्बर. मायाजालावर फोटोबघून इथे जायचेच हे आधीच ठरवले होते. पॅरिसवरुन इकडे जायला ट्रॅव्हल बसेस आहेत. ४-५ तासाचा प्रवास होता. बसचे बुकिंगही आधीच करून टाकले होते. फॉरेनचे बीचेस आणि ते पण उन्हाळ्यात म्हणल्यावर