शिव-सिंहासन-भाग ५ (अंतिम भाग)

  • 8.4k
  • 1
  • 3.2k

चौघेही आता समोरच्या मॉनिटरवर टक लावून पाहत होते..जसे जसे ड्रोन अजून जवळ जात होते तसे तसे ते चुन्याच्या पाण्याचे ओघळ स्पष्ट दिसत होते...सर्वांची उत्सुकता वाढली होती...मिलिंद बोलला " १०० टक्के हे पाणी काल तलावात पडलेल्या चुन्याचे होते " प्रसादने हि त्याला दुजोरा दिला... म्हणजे नक्कीच एखादा भुयारी मार्ग होता किंवा एखादी गुहा तरी होती...अमित बोलला...आणि तेवढ्यात भिवाजी धावत आला भुयारात जे खोदकाम चालले होते... त्याचीच त्याला बातमी द्यायची होती...त्याचा श्वास फुलला होता..छाती धपापत होती ...धावत येताना फक्त पडायचा बाकी होता...त्याने काहीतरी तिघांना सांगितले आणि ते तिघेही हातातले काम सोडून धावतच निघाले.... भुयारातुन जवळ जवळ सर्व मजूर बाहेर