आजा गुन्हा कर ले (भाग-१)

  • 6.6k
  • 2
  • 3.4k

“दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, एक नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वागेल ते फक्त दिन्याच सांगु शकतो. मला तर कधी कधी जाम भिती वाटते त्याची. त्या उलट तो गाडीत मागे बसलेला संजु. महा-भित्रट, आम्ही तर त्याला फट्टुच म्हणतो. प्रत्येक गोष्टीची त्याला भितीच असते. मी मात्र अगदी बॅलन्स्ड आहे. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करुन निर्णय घेणारा. आम्ही तिघंही अगदी वेगळा विचार करणारे तरीही एकमेकांचे घट्ट मित्र. लागुन आलेल्या सुट्टीचे निमीत्त साधुन आम्ही गोव्याला निघालो होतो माझ्या गाडीतुन. पण दिन्या इतकी भयानक गाडी चालवत होता ना!!