३५. महाराष्ट्रातील किल्ले - १०

  • 8.1k
  • 2.8k

३५. महाराष्ट्रातील किल्ले- १० ९. सज्जनगड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही शिवशाहीची तर सज्जनगड ही अध्यात्मिक राजधानी मानली जात होती. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेले दिसते. समर्थ रामदास स्वामींनी या गडावर बराच काळ घालविला आणि याच गडावर त्यांनी समाधी घेतली. समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो सज्जनगड किल्ला सातारा शहरापासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्याला ७५० पायऱ्या आहेत. तसेच याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३००० फुट आहे. या किल्ल्यावरती २ तलाव आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी