प्रलय - २१

  • 8.9k
  • 3.4k

प्रलय-२१ काळोख होता . घन काळा कातळ काळोख . स्पर्श रूप रस गंध काहीच नव्हते . फक्त शब्द होते . तेही मनात . मन तरी होतं का...? काहीच जाणीव नव्हती. कोण होता तो ? काय होता तो ? फक्त शब्द होते . नि प्रश्न होते . बाकी काहीच नव्हतं . किती वेळ ..? वेळ तरी होती का..? असेल तर कशाला सापेक्ष धरून मोजणार..? निर्विकार अवस्था म्हणतात ती हीच का...? हळू हळू जाणीव आली . त्याला स्पर्श जाणवला . प्रकाशाला जणू त्याने स्पर्श केला होता . नंतर दिसू लागला तो दिव्य सोनेरी प्रकाश , आणि येऊ लागला सुमधुर सुगंध