अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (2)

  • 6.6k
  • 1
  • 4.2k

२. एन एन्काऊंटर विथ अ ब्युटी -या घटनेच्या वेळी मिस्टर वाघ खूप महत्त्वाच्या केसवर दुसऱ्या शहरात काम करत होता (पण नेहमी प्रमाणं या केस बद्दल मी तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण तसा मिस्टर वाघने दंडक घातलाय... काही सिक्युरिटी व कॉन्फिडेन्शियल सिक्रसी इशूज आहेत... मिस्टर वाघला काही प्रॉब्लेम नकोत म्हणून मी कधी काळ, वेळ, शहर, स्थळ-ठिकाणांची नांव मेन्शन करत नाही, पण ही केसच मिस्टर वाघच्या इतर केसेस प्रमाणं एक्सेप्शनल असल्यानं इथे मला शहराचं नांव सांगावं लागतंय. होप, मिस्टर वाघ समजून घेईल. आणि त्याला काही प्रोब्लेम्सना सामोरे जावे लागणार नाही... असो!) त्यानं ती केस कम्प्लिट केली. पण मिस्टर वाघला निवांतपणा इतक्यात मिळणार