प्रिती.. तुझी नी माझी– भाग २

  • 10.2k
  • 6.2k

निखिल रूम वर परतला तेव्हा फार खुशीत होता. त्याने आल्या आल्या आपल्या मित्रांना ओळखीबद्दल आणी झालेल्या सगळ्या गप्पा सांगितल्या. अंघोळी वगैरे उरकून निखिल आणि त्याची गॅग canteen मध्ये दाखल झाली. श्रेया आणि तिची मित्रमंडळी आधीच तिथे होती. आपल्या मित्रमंडळींसमोर आता आपण श्रेयाला ओळख देऊ वगैरे या विचारात निखीलने २-३दा श्रेयाच्या टेबलाकडे नजर टाकली पण तिचे लक्षच नव्हते. निखिल मात्र त्यामुळे फारच अस्वथ़ झाला. त्याची ही बैचैनी त्याच्या मित्रांच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली. सगळेजण मुद्दामच श्रेयाला ऐकू जाईल अश्या आवाजात बोलू लागले. “अर्रे निखिल.. हाय..! कधी आलास.. मी पाहिलेच नाही.”, एक“काय निखिल Morning Walk ला एकटाच