टाईम ट्रॅव्हल भाग ३ उलट अंकमोजणी चालू झाली १०...९...८...७...६...५...४...३...२...१ आणि...जोराचा धक्का बसला आणि ते अजस्त्र यंत्र चालू झाले...सात ते आठ आवर्तने झाल्यावर हवा तेवढा वेग प्राप्त झाला...आणि हळूहळू "कृष्ण-विवर" दिसू लागले..हळूहळू "कृष्ण-विवर" मोठे होऊ लागले...आणि ते यान पाच जणांसकट अलगदपणे कृष्ण-विवरच्या दिशेने निघाले...सर्व काही सुरळीत चालले होते...तिन्ही कंट्रोल रूम च्या संगणकावर.. व्यवस्थित नोंदणी होत होती...आणि अचानक कानठळ्या बसवणारा कडकडाट झाला..."कृष्ण-विवराने" अक्राळ - विक्राळ रुप घेतले होते..काहीतरी चुकले होते..अपेक्षेपेक्षा भयंकर असे "कृष्ण-विवर" तयार होत होते...वेग प्रचंड वाढत होता...तिन्ही कंट्रोल रूमवर गडबड उडाली होती.. "कृष्ण-विवर" नियंत्रणाबाहेर जात होते... कदाचित त्याने आपल्या पृथ्वीचा घासच घेतला असता...पण डॉ. अभय अष्टेकरानीं परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर...त्या यंत्राला