निशांत - 7

(7.2k)
  • 27.1k
  • 1
  • 23.8k

दुसर्या दिवशी रविवार होता. सकाळीच नाश्ता करून सुमितची स्वारी गायब झाली होती. सुट्टी असल्याने अनया निवांत झोपली होती. तिला उठवण्यासाठी सोनाली खोलीत गेली. अनया शांत झोपली होती झोपेत हसत होती , स्वप्नात असावी तिचा निरागस चेहेरा पाहुन सोनालीला कसेतरीच वाटल .. इतक्या लहान वयात पोरीच्या डोक्यावरच बापाच छत्र गेले होत “अनु उठ बेटा ,सकाळ झाली आता.”