निशांत - 8

(57)
  • 21.9k
  • 2
  • 16.1k

दुसर्या दिवशी सकाळ नेहेमीप्रमाणे उगवली. चहा नाश्ता करून सुमित बाहेर सटकला सोनाली पण अनयाचे आवरणे.तिची वेणी फणी डबा या गोष्टींच्या तयारीला लागली.. शाळेत सुद्धा कोणत्याही पुरुष व्यक्तीशी कारणाशिवाय बोलायचे नाही आणि मैत्रीणीना सोडुन पण जायचे नाही असे तिने कालच अनयाला बजावले होतेच आजही परत ती आठवण केल्यावर अनयाने मान डोलावली दप्तर घेऊन अनया मैत्रिणीसोबत शाळेत निघुन गेली.