अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (9)

  • 4.1k
  • 2.2k

९. एट दि एन्ड्, ट्रुथ प्रिवेल्ड् -"मग? तुम्ही तिलाही...?" मी मिस्टर वाघला घाबरून विचारलं."तुला तिची काळजी वाटणार माहीत होतं. म्हणून नाही मारलं." तो चेष्टेत म्हणाला.माझा चेहरा मक्ख होता. मी त्याच्या चेष्टेच्या मूड मध्ये याजीबात नव्हतो. हे समजून तो देखील गंभीर झाला. म्हणाला,"नाही!" त्यानं शांतपणे उत्तर दिलं."का?" मी गोंधळून विचारलं."कारण तीही तेच काम करत होती, जे मी करतोय! समाजातला कचरा साफ!" तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता म्हणाला."पण तुम्हाला तिला पोलिसांच्या स्वाधीन तर करावंच लागलं असेल?" मी शंकेन विचारलं."अनुषा सोबत असल्यानं; हो! पण एलिसला काही होणार नाही याचीही मी पुरेपूर व्यवस्था केली आहे!" तो म्हणाला."ते कसं काय?""माझा वकील तिची तिथली केस लढतोय!"