अनामिका

  • 11.6k
  • 2.9k

निकिता आणि गौरव शहराच्या एका नामांकित अश्या IT कंपनीमध्ये सेल्स आणि मार्केटिंग विभागात कार्यरत आहेत. निकिता २८ वर्षे वयाची एक सुंदर तरुणी आहे. आपल्या हुशारीने कमी वयातच टीम लीडर बनून, सध्या ती एक पूर्ण टीम सांभाळण्याचे काम करत आहे. एका छोट्याश्या खेड्यातून पुणे शहरात येऊन, जॉब करून, तिने स्वतःच घर घेतलं होत. सध्या तरी ती एकटीच राहात होती, तीच लग्न झालेलं नव्हतं पण वरसंशोधन चालू होत. गौरव तिच्याच टीम मधला एक अत्यंत हुशार सदस्य आहे. निकिता आणि तिची टीम गौरव च्या कामावर खूपच खूश आहेत. गौरव २६ वर्षे वयाचा एक सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेला तरुण आहे. गौरव मूळचा पुण्याचाच आहे, आणि आपल्या आई-वडिलांबरोबर राहतो. गौरवपेक्षा निकिता २ वर्षांनी मोठी