रुद्रा ! - २

(12)
  • 13.2k
  • 1
  • 9.8k

रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता. "रुद्रा ! बोलतोय. ""भेट हवीय!""कशाला?""मुका घ्यायचाय! बेवकूफ काहीतरी काम असल्याशिवाय कोण कोणाला फोन करील ?" बोलणाऱ्याचा सोलापुरीहेल स्पष्ट जाणवत होता. " काय काम? ""भेटीत सांगेन!""आत्ता दोन झाल्यात! तिसरी पास झाली कि ये !""तिसरी?""बियर !" रुद्राने फोन कट केला. तिसरी बियर संपवून त्याने रोस्टेड चिकन आणि फ्राईड राईस जेवणासाठी मागवले. फिंगर बाऊल मध्ये बोट बुडवताना, तो बुटकेला माणूस किंचित फेंगडे चालत त्याच्या पुढ्यात येऊन बसला. रुद्राने