रुद्रा ! - ३

(21)
  • 8.9k
  • 7.3k

इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता. "हा. जाधव काका बोला. सकाळीच आठवण काढलीत. काही विशेष?"हवालदार जाधव हा रिटायरमेंटला आलेला डिपार्टमेंट मधला आदरणीय सदस्य होता. अनुभवी आणि अत्यंत हुशार,पण तत्वनिष्ठ ! मागेच राहिला. त्यांच्या बरोबरीचे बरेच वर सरकले होते. राघव त्यांना आदराने वागवत असे व ते त्याच्याशी अदबीनेच वागत. एक लोभस बंध दोघात निर्माण झाला होता. आणि 'कामाशी इमान' हा त्यांच्यातील कॉमन दुवा होता!. "सर , एक खून झालाय!""कोठे? आणि कोण ?"" 'नक्षत्र 'बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये. बंगल्याचे मालक संतुकराव सहदेव यांचा! मी नाईटला होतो.