रुद्रा ! - ४

  • 9.4k
  • 1
  • 5.7k

राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते. "सर, कोणी तरी एक म्हातारा तुम्हाला भेटायचं म्हणुन आलाय. अर्जंट काम आहे असं म्हणतोय." शिपाई निरोप घेऊन आला. राघवच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे लोक नको त्या वेळेला येतात. कामात डिस्टरब झालेलं राघवला चालत नसे. पण एका वृद्धाला टाळणे त्याच्या जीवावर आले. "ठीक आहे. पाठव त्यांना. " राघवन उघड्या फाईल्स बंद करून ठेवल्या. पांढऱ्याशुभ्र रेशमी केसांचा स्लिम म्हातारा ताडताड पावले टाकत ताठ मानेने आत आला. तजेलदार चेहरा, साठीच्या आसपासचे परिपकव वय, 'मना सारखे करीन!