रुद्रा ! - ५

(18)
  • 13.9k
  • 2
  • 6.1k

फोनची रिंग वाजली म्हणून रुद्राने फोन उचलला. अननोन नंबर होता. "रुद्रा बोलतोय!""हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे आहेत?""साला, कोण बोलतंय? असल्या फडतूस गोष्टीन साठी माझ्या कडे वेळ नाही!""असं डोक्यात राख घालून घेण्यात काही अर्थ नसतो. सध्या मला फक्त तीन लाखाचं पाहिजेत! आणि ते तू देणार आहेस!""आबे हट !"रुद्रा फोन कट करत म्हणाला. पुन्हा रिंग वाजली. पण या वेळेस काही तरी मेसेज आल्याची होती. मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती! पुन्हा