रुद्रा ! - ८

  • 7.4k
  • 1
  • 4k

कालच्या 'राजयोग' डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते. संतुकराव अति श्रीमंत, तर तो त्या मानाने दरिद्री! काही नाते असेल का? हा भेटायला आल्या पासून संतुकराव आऊट हाऊस मध्ये का झोपू लागले? का तो फक्त त्यांचा विक्षिप्त पणा होता? नाही तो विक्षिप्तपणा खचितच नसावा. कारण विक्षिप्तपणा चार-दोन दिवस टिकेल, महिनाभर नाही! मनोहर पासून काहीतरी धोका आहे हे संतुकरावांना जाणवले होते! मनोहर