रुद्रा ! - ११

  • 8k
  • 1
  • 4.2k

मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य! आणि त्यामुळेच तो वैतागला होता. मनोहरचा नसला तरी जसवंतचा मोबाईल होताच कि! त्यात मनोहरचा नम्बर होता. कॉल हिस्ट्री मिळू शकणार होती! त्याने सायबर सेलच्या राकेशला फोन लावला. " राकेश, मी काल जसवंतचा फोन तुझ्या डिपार्टमेंटला जमा केलाय, त्यात मनोहरचा नम्बर असेल. कारण जसवंत आणि मनोहर सम्पर्कात होते. मला मनोहरची कॉल हिस्ट्री हवी आहे. "" सर,