रुद्रा ! - १२

(11)
  • 7k
  • 3.8k

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेल तर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! तरी त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागला तर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! रुद्राला काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते. ट्रेनला अजून बराच बराच