पोस्टमन काकास पत्र

  • 19.4k
  • 1
  • 5.2k

॥॥॥॥॥॥॥ पोस्टमनकाकांना पत्र ! ॥॥॥॥॥॥ प्रिय पोस्टमनकाका,स. न. वि. वि. आम्हा नागरिकांच्या मनात तुमचे काय स्थान आहे हे शब्दात नाही सांगता येणार. पण एक मात्र नक्की, देव जर खरेच असला ना तर त्यानंतर तुमचीच जागा आमच्या ह्रदयात असणार. आमच्या परिसरात तुमचे आगमन होताच, तुमच्याकडे सारे आशाळभूत नजरेने पाहतात. कुणी कितीही घाई-गडबडीत असला तरीही 'आपले काही पत्र ' आले तर नाही ना या आशेने तुमच्या समोरून जातांना रेंगाळतात. काही जण विचारतातही, 'साहेब, माझे काही आहे का?' ज्यांचे काही येणार आहे असे विद्यार्थी, नोकरीच्या शोधात असलेले तरुण, कामानिमित्ताने दूर गेलेल्या व्यक्तींंच्या