एका निर्भयाचे पत्र

  • 10k
  • 3.5k

:::::::::::::::::::::::::::एका निर्भयाचे पत्र :::::::::::::::::::प्रति,नीच दुष्क्रुत्य करणारांनो,यापेक्षा दुसरी उपमाच सूचत नाही रे तुमच्यासाठी! मी एक निर्बल निर्भया! गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही तुम्हा लांडग्यांच्या तावडीत सापडणारी, तुमच्या अत्याचाराला, अनैतिक वासनेला बळी पडणारी, विक्रुत चाळे सहन करणारी ! जशी मी कुठेही असते, कुठेही तुम्हाला सहजासहजी सापडू शकते तसेच वासनांधानो तुमचाही वावर सर्वत्र असतो. तुमची सावध, शोधक नजर एखाद्या पाखराला शोधत असते. तुमचे सुदैव आणि आम्हा निष्पाप निर्भयांचे दुर्दैव असे की, मनी वसे ते समोर दिसे याप्रमाणे आम्ही तुमच्या तावडीत सापडतो. भुकेल्या वाघाने एखाद्या शेळीवर तुटून पडावे तसे तुम्ही आम्हा निर्भयांवर तुटून पडता. तुम्हाला स्थळ, वेळ, काळ यापैकी कशाचेही भान राहात नाही. आपले नीच काम