किल्ले दौलतमंगळ आणि भुलेश्वर मंदिर

  • 13.8k
  • 2
  • 3.2k

किल्ले दौलतमंगळ आणि भुलेश्वर मंदिर शनिवार दिनांक २३.०२.१९ सकाळी ४. ०० वाजता आमचा दिवस चालू झाला...जवळ जवळ १ वर्षांनी एका मित्राला भेटायला जायचे होते..स्थळ होते पुणे आधी ठरल्याप्रमाणे मी आणि भिवाजी दोघे ठाणे स्टेशनला भेटलो सकाळी ५.४५ ला .. २२१०५ इंद्रायणी एक्सप्रेस पकडून जायचे ठरले..किती जण येणार ते माहिती नव्हते .. त्यामुळे रिझरवेशन आम्ही केले नव्हते...आणि आम्ही अंदाज बांधला होता..आम्ही दोघे जण जाणार म्हणजे रेल्वे आमच्यासाठी २ सीट त्यापण जनरल मध्ये राखून ठेवणार...ठाणे ला आत घुसतानाच मारामारी बसायला काय कपाळ मिळणार.. त्यात आत घुसत असताना..माझ्या बॅगेचे दोन्ही पट्टे एका आजीने जोरात खेचले..का तर तिला वर चढता