प्यार मे.. कधी कधी (भाग-६)

(15)
  • 15.4k
  • 1
  • 10.6k

टेबलावर ठेवलेलं ऑम्लेट ब्रेड गार होऊन गेलं होतं. खरं तर आई बर्‍याच वेळ माझ्याकडे बघत आहे.. माझ्या लक्षात आलं होतं, पण मला त्या ऑम्लेटमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. शेवटी आई टेबलापाशी आलीच.. “का रे? काही खात नाहीस? तब्येत बरी नाही का?”“नाही.. ठिक आहे.. थोडं डोक जड झालंय..”“सुट्टी घे मग ऑफीसला.. सारखं आपलं दिवस-रात्र कॉम्युटरसमोर बसायचं ते..”“काय गं आई.. तेच काम आहे माझं. आणि असं कधीही आपण म्हणलं की सुट्टी घेता येते का?”“अरे पण.. तब्येतच बरी नसेल तर…”“काही धाड भरली नाहीये तब्येतीला.. ठिक आहे मी.. आत्ता भूक नाहीये फक्त.. ऑफीसमध्ये खाईन काही तरी..” “अरे मग ज्यूस तरी…”“आई प्लिज.. उगाच डोकं नको उठवूं..