निसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार

  • 15.5k
  • 1
  • 2.5k

वारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. वारली समाजात होणारा विवाह संस्कार हासुद्धा त्यांच्या कलेइतकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याविषयी हा लेख. वारली समाज हा महाराष्ट्राच्या डहाणू,तलासरी या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिसरात राहतो. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे ८ लोकसंख्या या जमातीची आहे. त्यांची बोलीभाषा मराठी आहे.