मोगऱ्याची जादू...

  • 5.9k
  • 1.6k

लग्नाचा वाढदिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस, कारण लग्न म्हणजे कैक कडू गोड अनुभवांचा ठेवा, नविन आयुष्यात पदार्पण केल्याचा सोहळा, अनेक नविन नात्यांची गुंफण प्रेमाने जपणारा धागा, आणि निरस आयुष्याला ही सोनेरी स्वप्नदुनियेत घेऊन जाणारं सुख. या सगळ्या गोष्टींची सतत जाणिव करून देणारा, आठवण करून देणारा दिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस.. सगळ्यां दाम्पत्यांना हवाहवासा वाटणारा दिवस. काल त्यांच्याही लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी पूर्ण दिवस सोबत घालवला.... सोबत जेवण केलं, गप्पा केल्या, हसले, जुने क्षण आठवून त्या गोड आठवणीत हातात हात घेऊन हरवले, मनमोकळ हसले आणि रडले सुद्धा….. त्या जुन्या काही शक्य तेवढ्या स्थळांना ही भेट दिली, जिथे ते आधी जायचे.. रात्री